रे जीवना
तु असा रे कसा
कधी चन्चल कधी गम्भीर
कधी झुळझुळणारा झरा
कधी मन्द कधी सुसाट
जसा रोरावणारा वारा
कधी इन्द्रधनू कधी बेरन्गी
कधी शुभ्र पान्ढरा
कधी लेवून साज फुलान्चा
वसन्त लाजरा बावरा
कधी रौद्र कधी शान्त
कधी उसळणार्या लाटा
कधी छोटिशी पाउलवाट
तर कधी फुटती लाखो वाटा
कधी उदास कधी आनन्दी
कधी रुणझुणणारे पैन्जण
कधी रुक्ष कधी ओसाड
नादाशिवाय सूने आन्गण
कधी सूर सूना कधी केविलवाणा
कधी निघती सुरेल ताना
कधी गाणे हे जल्लोषाचे
कधी कोषात दडी मारीशी रे जीवना
रे जीवना
तु असा रे कसा
Unknown