भारतमाते त्रिवार नमन तुला
तुझ्या अढळस्थानाला,अचलतेला
काळ कठीण किती तुजवर पातला
त्यालाही नमवून तू तीर गाठला
दर्या गे तुजवरी खवळला
त्सुनामीने हाहाकार उडवला
अनेक घरे अनेक प्राणी
सर्व खेचूनी गेले पाणी
न खचलीस तू, न हारलीस तू
निसर्ग आपत्तिला सामोरी गेलीस तू
जमिन गे तुजवरी सन्तापली
कच्चच्या भूमीवर आग ओकली
भस्मसात झाले तुझे एक अन्ग
धगधगत्या ज्वाळाना कोण विझवी ग
न थाम्बलीस तू,न माघारी फिरलीस तू
भूकम्पाला या मात दिलीस तू
गोध्राचे भीषण हत्याकान्ड
मनुष्यजातील गे काळिमा
तुझ्याच भूमिवर जन्मला
माणूस माणसावरी का उठला
खिन्न तू, उदास तू, परि ना विचलीत तू
बळी गेलेल्या प्रत्येकाला दिलास आधार तू
पाण्याचा उर उचम्बळून आला
गुजरातेत त्याने गाव वसविला
वाहती घरे अन त्यासवे लोकही
पाण्याची भूक वाढे, हाव ही त्याला कसली
खम्बीर पाय रोवलास तू
बुडत्या प्रत्येकाला आसरा दिलास तू
मुम्बई नगरी तुझा आत्मा
त्या काळजावर घाव घातला
अनेक बोम्ब्स्फोटान्ची मालिका
रक्तमासाशिवाय काही दिसेना
न सम्पलीस तू, न हारलीस तू
राखेतून नवी भरारी घेतलीस तू
अहमदाबाद तुझे सुरेख अन्ग
बोम्बहल्ल्यानी झाले छिन्नविछीन्न
मोठी कापडपेठ ही तरी
उघड्या प्रेतान्शिवाय दुसरे काही नाही
तुझ्या सन्यमाची साक्श दिलीस तू
भग्न वास्तुतून राज्य वसवलेस तू
मुम्बईची व्यथा काय वर्णावी
दुखाला तिच्या तोड नसावी
ताज, ओबेराय ऐतिहासिक वास्तू
अतिरेक्यान्चे लक्श्य बनली जणू
अनेक लढवैय्ये गमावलेस तू
परी मनाने उभारी धरलीस तू
खेचून त्या दुष्टात्म्याना कन्ठस्नान घातलेस तू
कर्तबगार पोलिसान्ची मान उन्चावलीस तू
अभेद्य तू अखन्ड तू
त्रिखन्डात या शौर्याची मिसाल तू
नाही कुणी तुझापरी गे
तुझ्यासारखी तूच माते
तुझ्यासारखी तूच
Unknown