ओसाड रुक्ष वाळवन्टात
डोक्यावर तप्त भास्कर आग ओकत असताना
एकाकी अनवाणी पावलानी चालताना
दूरवर अचानक निळ्याशार
पाण्याचा झरा दिसावा
त्या थन्डाव्याच्या ओढीने झपाझप पाउले
टाकीत तिथवर पोचावे
आणि
समोर रणरणती वाळू बघून
पायातले त्राण निघून जावे
गारव्याच्या आशेने फुलारलेल्या मनाचा
निराशेच्या गर्तेत कडेलोट व्हावा
तसाच तू
त्या मृगजळासारखा
माझ्या हृदयाच्या ओसाड मातीत
तुझ्या अस्तित्वाची बाग फुलतिये
या आभासाने मोहरून येण्याच्या आधीच
सुसाट वादळासारखा येणारा
आणी माझा प्रत्येक भास खोटा ठरवून जाणारा
Unknown