अरे आपण काहीतरी देण लागतोय
त्या निळ्या आभाळाच
ज्याने घातलीये पखरण
आपल्या विशाल मायेची
अवघ्या चराचरावर
आपण देण लागतोय
त्या नीलवर्ण मेघाच
जो स्वता फुटून बरसतोय
आपली तहान भागवण्यासाठी
आपण देण लागतोय
त्या काळ्या मातीमायेच
जी स्वता सहन करते यातना
आपली भूक मिटवण्यासाठी
आपण देण लागतोय
त्या झाडाच्या प्रत्येक पानाच
जी स्वता पडतायत बळी
आपल्याला शुद्ध हवा देण्यासाठी
आपण देण लागतोय
प्रत्ये फुल न फुलाच्या पाकळीच
ज्याना खुडल जातय अकालीच
आपल सौन्दर्य वाढण्यासाठी
आपण देण लागतोय
आपल्यात लपलेल्या माणुसकीच
जिचा होतोय खून हरघडी
फक्त स्वताच्या फायद्यासाठी
Unknown