गीत लिहित राहिलो माझे,
न विचार करता काय असेल चाल.
चालत राहिलो ऐकून स्वताचे,
ना पेलले आशीर्वाद, ना झेलली शिवीगाळ.
तो देवच मला मान्य नाही,
जो माझे कर्म पापपुण्यात मोजतो.
माझा देव तोच खरा,
जो सतत आतून माझ्याशी बोलतो.
भुकेलेल्या घास भरविला,
न विचारता त्याची जात.
निर्मात्याने एकच रंग मिसळला,
आम्हा दोघांच्या रक्तात.
माझ्यासारखीच त्याचीही तृषा आहे,
एकच पाणी शांत करते दोघांचाही गळा.
तुम्हास हवे असेल वेगळे तळे, वेगळे पाणी,
तर वेगळा पाऊसच मागा, त्या मोकळ्या आभाळा.
.................अमोल