मनकधी कळलंय का कोणाला
हे मन निराकार
कधी अगदी सूक्ष्म तर कधी अथांग
मन आहे तरी कसे
हळुवार फुलासारखे की त्या फुलावर
भिरभिरणाऱ्या फूलपाखरासारखे
मन आहे तरी कसे
उनाड सैरभैर वाऱ्यासारखे की त्याला थोपवणाऱ्या
धीरगंभीर पर्वतासारखे
या मनाचे रंगच वेगळे
कधी कोणावर रुसत
तर कधी स्वतःवरच हसत
कधी कधी ते आपलेही राहत नाही
अगदी हळवे होते कोणासाठी
काय बरे मनाच्याही मनात………… त्या कोणासाठी
....................
प्रसाद 