मी शोधण्या स्वतःला मागवला नकाशा,
कुणा ठाऊक कुठे मी हरवलो आताशा.
मी ओळखण्या स्वतःला पाहिला आरसा,
कळले स्वतःलाच ओळखत नव्हतो फारसा.
जुनी तस्वीर मी माझीच धान्डोळून पहिली,
आत्ताची आकृती कुठेच न आढळून आली.
मागचे मार्गही पुसलेले पुढचे हि अद्न्यात होते,
मी नेमका हरवलो कसा हे मलाच ज्ञात नव्हते.
गतकालीच्या खुणांचा शोधच सारा ठप्प होता,
कारण मी हरवल्यानंतर तिथे झाला भूकंप होता.
.................अमोल