संकल्प
मार्चमध्ये आल्या परीक्षा
म्हटलं आता अभ्यास करू
संकल्पाचे नंतर बघू
आधी परीक्षा पार करू.
एप्रिल-मेमध्ये सुट्टी मिळाली
म्हटलं करूया संकल्प.
रात्री मालिका बघताना
पुन्हा थांबला संकल्प.
जून-जुलै शाळा सुरू झाली.
संकल्प काही घडला नाही.
स्वातंत्र्यदिनी तरी लवकर उठूया
घड्याळाचा गजरच झाला नाही.
आली गणेशचतुथीर् आता
म्हटलं संकल्प करूया.
गणपती विसर्जन करून आलो
म्हटलं उद्या उशिरा उठूया.
दिवाळीत तरी संकल्प करू
असते खूप सुट्टी.
रात्री फटाके फोडताना
सकाळी संकल्पाशी कट्टी.
नोव्हेंबरमध्येही तसेच झाले
संकल्प नाही घडला.
डिसेंबरमध्ये यातून आम्ही
चांगलाच धडा घेतला.
म्हणूनच म्हणतो मित्रांनो
बसून राहायचे गप्प.
जर झेपतच
नसेल तर
कशाला करावा
आपण संकल्प?
Author Unknown