आयुष्याचं गणित
शाळेत आपण शिकतो
ते व्यवहारातलं गणित
चला आता शिकू सारे
..............
या हास्य अधिक नैराश्य
असं आपलं आयुष्य
हास्य वजा झालं तर
उरेल फक्त नैराश्य
.............
एकूण आयुष्य असतं
सुखदु:खाची बेरीज
सुखाची गंमत नसते
थोड्याशा दु:खाखेरीज
...................
आयुष्य या संख्येतून
दृष्कृत्यांना वजा करा
बाकी उरलेल्या सत्कृत्यांना
जीवनाचे साथी करा
.................
व्यवहारातलं गणित
तर साऱ्यांनाच येतं
पण आयुष्याचं गणित
हे बहुतेकांचं चुकतं
.......................
करा सद्गुणांची बेरीज
अन वजाबाकी दुर्गुणांची
उत्तर मिळेल गणिताचं
किंमत फार मोठी त्याची