प्रश्नचिन्ह
प्रिया पाटील
माझा पूर्णविराम अर्धविरामच राहिला
अधोरेखित वाक्यापुढे प्रश्नचिन्ह पडला
मृगजळा मागे धावता धावता स्वल्पविराम वाढला
अनंत ओळी संपल्या तरी शेवटी प्रश्नचिन्ह पडला
एकेरी ओळीत जगताना दुहेरी ओळीचा ध्यास लागला
पाढयांच्या त्या असंख्य चौकटयां पुढे प्रश्नचिन्ह पडला
भाज्याला भाजकाने भाग घालून भागाकार अपूर्णाकात गेला
पण शिल्लक राहिलेल्या बाकीपुढे शेवटी प्रश्नचिन्ह पडला