सुंदर नितळ आभाळी केली गर्दी ढगांनी
उष्माघाताने तोही व्याकूळ झाला
रडू कोसळले त्याला अन पाउस आला
वारा सोसाट्याचा सुटला
सगळीकडे मातीचा सुगंध पसरला
उष्माघाताने बैचैन जीव थोडा शांत झाला
शिडकावा पावसाचा मनाला
ओलावा देवून गेला
श्रुष्टी अवघी कोमेजलेली तरारून गेला
त्या संध्याकाळी दूरवर जाण्याचा
मोह आवरेना मनाला
कडकडत्या उन्हाच्या झळा परतवण्या
वरूण आला वरूण आला
रडू कोसळले त्याला अन पाउस आला
कविता बोडस