रात्र सरेना दिस ढळेना
पिलांच्या आठवाने अश्रू सरेना
काळजावर घातला घाव नियतीने
हे का त्या पिलांना कळेना
मोठ्याचे ओझे त्यांनी का सोसावे
पण मायेच्या सावलीस तरी त्यांनी का मुकावे
नीज येत असेल का हो त्यांना माझ्याविना
येत असेल का हो जाग त्यांना माझ्याविना
येत असेल का हो माझ्या उबेची जाणीव त्यांना
संपणार कधी हि घालमेल
मीच लावली न हि वंशवेल
आईची ममता आईसच ठाऊक असे
काळजावर दगड ठेवून जगू तरी कसे
सोसवेना हा दुरावा काय देवू यास पुरावा
प्रश्न पडे मज एकाच असा आई हा शब्द तरी का उरावा
कविता बोडस