Author Topic: पाऊस  (Read 708 times)

Offline indradhanu

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
पाऊस
« on: March 19, 2010, 07:26:58 AM »
पावसात हरवला वारा
पान झाडाचे हलेना
ओलावलेल्या मातीला
गूढ गंधाचे कळेना
 
चिंब झाले सगळे
रानवाटा बुडाल्या
शाताच्या बांधावर
रानवेली विसावल्या

रिमझिम सरीतून
ऊन केशरी गळते
आकाशाच्या अंगणात
इंद्रधनुष्य खेळते.
                     ----- Unknown
« Last Edit: October 23, 2010, 02:05:21 PM by santoshi.world »

Marathi Kavita : मराठी कविता