गाड़ी थांबली , गर्दी जमली ,
लागले त्यांचे आमच्या घराला पाय
काही क्षण आसे वाटले
दुःखाचे दिस ढळले नवी सुरवात ही हाय
खुप गंभीर चेहर्याने त्यांनी चौकशी केली
आश्रू डोळ्यात आणित भाषनबाजी झाली
सरकार हे करील , सरकार ते करील
खुप काही काही ते बडबडले
बर्याच गोष्टींचा त्यात आर्थ
ही लागला नाही पण भाषण
छान झाले नेते बडबडले
बंद लिफाफ्यातुंन ऐक कागुद
बाहेर काढला, म्हटले मदत म्हणुन
बघा चेकच बरोबर आणला
फोटो च तेवढ नीट पाहून घ्या
नेते सुचना करीत म्हणाले
आम्ही आपले दुःख दाबित कसे तरी
पुढे सरसावलो
त्यांच्या परीने त्यानी
नुकसान भरपाई दिली होती
कागदाच्या चार चीठयात
माझ्या बापाची किंमत केली होती .
खुपदा समजावल होत त्याला
सोडून देवू शेती हे काय खर नाय
जीवनच संपवल त्यांन आणि शेवटी ही
हेच सांगितले .
यिकायची नाय, पडीक टाकायची नाय
ध्यानात ठेव इतकेच हीच हाय आपली माय
===========================
ღ ღसुगंधღ ღ6/1/09