अश्रू
अचानक डोळ्यांच्या कडा ओलावल्या
आणी तो अलगद डोळ्यातून ओघळला
गालाचा क्षणभर आधार घेऊन
बिचारा कोणाच्याही नकळत मातीत मीसळला
कधी माझ्या भावना
शब्दातच बांधल्या गेल्या नाहीत
तर त्याला दोष देऊन काय उपयोग
कधी कोणावर अधिकारच न्हवता
तर व्यथा सांगून काय उपयोग
म्हणून आधार घेतला अश्रूंचा
जाल्धारांप्रमाणे बरसणाऱ्या त्या थेम्बाना
कधी कोणाच्या नजरेत अर्थच न्हवता
जिथे माझ्या भावनांचाच सौदा झाला
तीथे त्या अश्रूला कुठे मोल होता
त्या अश्रूला कुठे मोल होता ?
आज माझे लाख सलाम
त्या ओघालेल्या अश्रुना
आठवणीत तुझ्या वाहता वाहता
स्वताच अस्तित्व मिटवून जातात.
मनासारख जळत बसत नाहीत
जळणाऱ्या मनावर आधाराची
फुंकर घालून जातात.
----सौ. अनघा अभीजीत बोभाटे.---