~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!
एकनार आसशील तर
आज काही सांगायचय
देणार आसशील तर
आज काही मागायचय
खूप झाले दुरून इशारे
खूप झाले खोटे बहाने
जवळ येऊन आज
काही बोलायचय
एकनार आसशील तर
आज काही सांगायचय
प्रेम आहे तुज्यावर
व्यक्त आज करायचय
झुरतो तुज्यासाठीच
दिवस रात्र ईतकेच सांगायचय
दाखवून तुझ्यावरचे प्रेम
प्रेम तुझ्याकडून मागायचाय
एकनार आसशील तर
आज काही सांगायचय
किती दिवस आशी वेगवेगळी
कारणे काढून उगाचच भेटायाच
बेधुंद झालेल्या मनाला उगाचच थोपवायाच
तुझ्यावरील प्रेमाला तुझ्यापासूनच लपवायच
एकाच संधीत आज सार सार मागायचय
एकनार आसशील तर
आज काही सांगायचय
~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!
सुगंध
~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!