माझ्या एका मैत्रिणीसाठी तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना देण्यासाठी केलेली ही माझी कविता.
मी आता राहिली नसेन मुलगी लहान
जिला नेहमी पहिजे असायच्या गोष्टी छान
पण अजूनही आपण दूर असताना
रडू येतं तुम्हांला आठवताना.
मला नसेल राहिली गरज तुमच्या हाताची
नविन पायऱ्या चढताना जीवनाची
पण अजूनही लागते तुमच्या शिजोरीची काठी
मी बरोबर आहे हे समजण्यासाठी.
मी नसेन राहिली आता लहान आणि छोटी
तुमच्याकडे हट्ट करणारी मोठी,
हट्ट तर तुम्ही सगळेच पुरवले
पण मीच तुमचे आभार मानायला विसरले.
मागील जीवनाकडे जेव्हा मी वळून बघते
तुमचे कष्ट व त्याग दिसते,
खरंच आई बाबांचे प्रेमच मोठे
पण मीच आभार मानायला विसरले होते.
तुमच्या या खास दिवसाच्या निमित्ताने
मी तुमचे आभार मानते मनाने,
असेच रहा नेहमी माझ्या बरोबर
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर.
- शशांक