तुझ्याच जवळ बसून आहे, आई
का मला सोडून जायची आहे घाई
तुझा हाथ पकडून मी पाही
माझी प्राथना कधी संपणार नाही
जग जणू जसे थांबून गेलय
मौन सर्वीकडे का पसरलय
राहिलोय तू आणी मी एकटेच आज
आणि टीक टीक तुझ्या घडल्याचा आवाज
मनात दुखाना कोंडून घेऊन
हृदयाला थोडे अश्वासन देऊन
माझे सर्व लक्ष्य ओढून घेतंय आता
टिक टिक करणारा तुझ्या घड्यालाचा काटा
कितेक दिवस गेले असे बसून
तो आवाज ऐकता मना पासून
आई तू गेलीस मला सोडून
हा विचारच ताकतोय मला मोडून
स्वर्गाचे द्वार आता उघडलंय
आई चल आपल्याला जायचंय
चालत राहीन तुझ्या बरोबर मीही
जो पर्यंत तुझा प्रवास संपत नाही
जाऊन तुला कितेक महिने झाले
हळू हळू दुख आवरता मला आले
तरी तुझा आवाज ऐकण्यास कान तरसतात
तुझा हसरा चेहरा शोधण्यास डोळे बघतात
मन कधी जेव्हा जास्तच भरून येतो
हाथावर डोके ठेऊन मी निजतो
आई, तुझ्या घड्याळाचा टिक टिक आवाज ऐकू येतो
तू माझ्या बरोबरच आहेस याची जाणीव करून देतो...
- शशांक दिघ