मी जगलोही तसा सामान्यपणे,
मी मेलोही तसा सामान्यपणे,
वळून पुन्हा पाहिले जेव्हा,
तेव्हा कळले उरलो मी नगन्यपणे.......................
.
.
.
.
.
जाता जाता बुडाली खोल सागरात नाव माझी,
काठावर तरी तरण्याची मला सवय कुठे होती.
शांत लाटेने उलथवला डाव क्षणात सारा,
पाण्यात तरी उतरण्याची मला सवय कुठे होती.
मी बुडताना देखील हातपाय मारले नाही,
खोटेखोटे तरी लढण्याची मला सवय कुठे होती.
मी ढसाढसा रडलो हार पाहुनी माझी,
या पूर्वी तरी हरण्याची मला सवय कुठे होती.
मला देताही न आले जगताना कुणास काही,
निष्काम तरी जिण्याची मला सवय कुठे होती.
मला ठेवताही न आले मरताना शेष काही,
इतुक्या सहज तरी मरण्याची मला सवय कुठे होती.
कापूर हसतो आता निर्गंध माझ्या राखेला,
जळून गंधरूप तरी उरण्याची मला सवय कुठे होती.
.................अमोल