प्रत्येक ऋतू आणि प्रकाशाच्या किरणे बरोबर
सौंदर्य सरोवराचे बदलत असतं खरोखर
तरीही प्रत्येक बदल किती सुरेख दिसतं
प्रत्येक बदल आपल्या कारणाने मौल्यवान असतं
सूर्यकिरणेत, सोनेरी चांदण्यांचा पाण्यावरचा नाच
तर चंद्रप्रकाशात, एक सुखद शांततेचा आभास
हवेबरोबर, सफेद लाटांचं एक मेकांना हरवणं
तर निःस्तब्धतेत, प्रत्येकाचे मनन करणं
सरोवराच्या पाण्याला जसा रोज एक नवीन पोशाक मिळतो
कधी तांबडा तर कधी हिरवा, कधी सफेद तर कधी निळा भासतो
जरी प्रत्येक बदल वेगळा वाटला, सरोवर हा सरोवरच
लक्षणीय आपल्या प्रत्येक रंगात, भावनेत, भूशात खरोखरच
सरोवराचा हा विचार मला आठवण करून देतो तुझी
गोड हसरी माझ्यावर खूप प्रेम करणारी बायको माझी
प्रत्येक सुखांच्या वळणावर आणि दुखांच्या वादळात
तूच होतीस माझ्याबरोबर नेहमी मला सांभाळत
तुझं प्रेमच माझं चांदणं, प्रकाश आणि सूर्यकिरण आहे
तुझा प्रत्येक रंग आणि भावना माझ्यासाठी मौल्यवान आहे
तू प्रत्येक दिवस लक्षणीय, जगणीय बनवतेस माझा
असच प्रेम करत राहीन तुझ्यावर सदेव हृदय माझा
- शशांक