बरसणं हंवच
निळ्या, निरभ्र, निवांत आकाशाशी
बघतों मी नेहमीच नातं जोडायला
आणि जुळताताही सूर आमचे बरेचसे
उणीव काय असावी, दूरी पूरी मिटायला
ढगाळून ओथंबलेलं पांघरून आकाश
उभा ठाकतो मग जीवघेणा एक दिवस
धाड धाड ओढतही सुटतो आसूड
सूडाने पेटल्यागत अविरत तो पाऊस
अन कितीही आक्रोशून नाकारलं मी
तरी, वीजा विचकून दांत, टाकतात उजळून
नकोसं मला असलेलं खोलवरचं नातं माझं
रौद्ररुपी वरच्या त्या अस्मानी थैमानाशी
दिसणं तुझं म्हणूनच म्हणतो नाही पुरेसं
निळ्या, निरभ्र, निवांत त्या आकाशाला
चांदण्यासारखं बरसणंही हंवय तुझं मंद
नातं चांगल्याचं माझ्या, तुजसंगे बहरायला.
......................Author Unknown