मि जेव्हा मरुन जाईन
तेव्हा मला जाळु नका,
आयुश्यभर जळत होतो
आणखी चटके देउ नका.
जेव्हा माझा अन्त होईल
तेव्हा तुम्ही रडु नका,
जन्मभर मी रडत होतो
शेवटी रडणे ऐकवु नका.
माझ्या देहाचे ओझे
खान्द्यावर नेऊ नका,
आयुश्याचे ओझे मी वाहीले
उपकाराचे ओझे ठेवु नका.
माझ्या निश्पाप देहावर
कुणीही फुले वाहु नका,
माझ्या वेदनेचा गन्ध
फुलान्च्या वासात दडऊ नका.
माझ्या देहाच्या मातीला
शेवटी नमस्कार करु नका,
आयुश्यभर पायाखाली तुडवल
आता पाया पडु नका.
कवी अज्ञात...............................................
