आपल्या तरुणीच्या बेहोशीत झालेल्या चुकांमुळे आपली पत्नी आणि मुलगा यांच्यापासून दूर जाणार्या एका पती आणि पिता याच्या विरहाची कहाणी.
तू सहज सांगितलस कि,
"माझ्या मुलावर तुझी सावलीही नको."
आणि मी हि अलवार निघून जातो,
सावली सारखाच.............,
पावलांचे, अस्तित्वाचे ठसे न उमटवता,
आशेच्या रेघोट्या न ओढता,
अगदी शांतपणे, संथपणे.......
नि......
छाया ओतल्या जागेवर जराही हक्क न सांगता.
मी निघून गेलो आहे अज्ञातवासाच्या अंधारात,
जिथे मला माझीही सावली सापडणार नाहीये...
म्हणजे मला समाधान असेल कि, माझी सावली वाया जात नाहीये....
तुझ्या पासून दूर जाण्याला...........
माझ्या भोवती प्रचंड काळोख करून घेण्याला....
बहुधा......प्रचंड काळोखात मी शिरण्याला,
कारणीभूतही मीच आहे....
जमल्यास क्षमा कर.............
.................अमोल