उघडता तीच जुनी पाने
आज पुन्हा दरवळलो मी
फुललो न पुन्हा कधी जरी...तरी
तुला फुलवून सुखावलो मी....
झालो होतो कैद या पानांत
जशी आसवे तुझ्या डोळ्यांत
या आसवांसवे इथेच....
थिजलो..सुकलो..जीर्ण झालो मी....
आज कैक वर्षांनी...
ओंजळीत घेता तू ...
निखळत्या आसवांसवे...
पाकळी पाकळी निखळलो मी...
तुझ्या ओल्या आठवणभूमीत
शुष्क देहाने...पुन्हा नव्याने रुजलो मी..
उघडता तीच जुनी पाने ......
-पंकज
स्वरचित.......