स्वप्नान मागून आलेल्या आकांक्षाना
कधीच मोल नसावं तशी तू ,
माझ्या मागून अंधारातही सावली झालीस
पण,
तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये
या विखुरलेल्या असावांशिवाय......
निरागस डोळ्यांशिवाय...
निशब्ध ओठांशिवाय....
कोणती अपेक्षा करतेयेस तू माझ्याकडून
खरंच...
तू दूर निघून जा इथून
तुझ्या अपेक्षेने भरलेल्या मनाची....
स्वप्नात भिजलेल्या डोळ्याची....
ओठांवर दाटलेल्या शब्धांची...
तेथे कोणीतरी वाट पाहत असेल
विरहाचा कफन माझ्यावर केंव्हाच चढवला गेलाय
आता वाट पाहतोय मुठभर मातीची....
रुद्र...............................................
