मनात फुलणाऱ्या सवेंदना
साकारत असतात हृदयातील वेदना ...
अंतरंगात उमलणार्या निनादाना
अर्थ देत असतात नाद ...
अनन्तातल्या प्रतिसादाच्या गर्भात
असतेच कुठेतरी साद ...
जाणीवेतल्या संवेदना विसंबतात
नेणीवेतल्या वेदनेवर....
भावनेचा प्रवाह साकारतो
मनात तरंगनार्या आकारावर...
क्षणा क्षणाला कॅलिडोस्कोपच्या खेळात
काही कल्पना अंतरतात मनात...
तर काही जन्मतात कल्पनेच्या भावविश्वात ... दिलीप पाटील