Author Topic: अनामिका आणि सिगरेट...  (Read 786 times)

Offline pankh09

 • Newbie
 • *
 • Posts: 41
अनामिका आणि सिगरेट...
« on: August 01, 2010, 08:29:55 AM »

का.का. ला निरोप देऊन..{कार्यालयीन कामकाज}
बाहेर पडतो न पडतो...
तोच पावसाने मला...
अगदी बेसावध गाठले..

शेवटची उरलेली सिगरेट..
खिशातच भिजू नये म्हणून...
केलेल्या आटोकाट प्रयत्नात...
मीच निघालो न्हाउन...

कसाबसा बसस्टॉप गाठून..
हुडहुडी भरलेल्या हातांनी..
सिगरेट पेटवून..
पहिला कश घेतो न घेतो तोच..
ती तिथे आली...

चिंब भिजलेली..
थोड़ीशी थिजलेली...
गार वाऱ्याचा मारा..
अंगावर शहारा...
गालांवरून ओघळणारी..
काजळाची रेघ..
नाकाच्या शेंड्यावर लटकणारा...
तो पावसाचा थेंब....

हलकेच बोलली..
कापऱ्या आवाजात..
"एक सिगरेट मिळेल का मला?
खुप तल्लफ होते पिण्याची
अशा बेधुंद पावसात... "

"सॉरी... पण ही शेवटची होती "...
"मग हरकत नसेल तर share करुया ?"...
"sure, why not.... "

तिच्या भिजलेल्या ओठातुन ओघळणारी...
ती स्वप्नाळलेली क्षणभंगुर धूम्रवलये....
होती अगदी तिच्या भेटीप्रमाने....
क्षणभंगुर.....पण निरंतर मनात रेंगाळणारी....

पुन्हा कधीच भेटली नाही ती अनामिका...
गेली अनामिक आस लावून..
सरल्या कैक संध्या माझ्या...
तिथेच...ओल्या चिंब होऊन..-पंकज
स्वरचित....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: अनामिका आणि सिगरेट...
« Reply #1 on: August 02, 2010, 03:59:42 PM »
very very nice pankaj its like me ........................... 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) 8) .....................ajun nahi aali ti :(

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: अनामिका आणि सिगरेट...
« Reply #2 on: August 03, 2010, 08:34:01 AM »
 :) ;) :D :D

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: अनामिका आणि सिगरेट...
« Reply #3 on: August 13, 2010, 07:00:58 PM »
 8)  chan aahe

Offline rutu

 • Newbie
 • *
 • Posts: 7
Re: अनामिका आणि सिगरेट...
« Reply #4 on: August 30, 2010, 12:19:22 PM »
 Realy nice !!!! 8)