Author Topic: तू असा कसा रे..?  (Read 1713 times)

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
तू असा कसा रे..?
« on: August 02, 2010, 12:35:35 PM »
अधीर.., लाजर्‍या तरी बोचर्‍या
सख्या सोयर्‍या....,
.....................तू असा कसा रे..?

कधी पेरतो स्वप्ने हळवी
सखा साजिरा जणु असा
क्षणात येशी दारी माझ्या
क्षणात जाशी दुर कसा..?
.....................तू असा कसा रे..?

सदैव फिरशी चहू दिशा
धुंद समीरा, तू यार असा
जणु कलंदर, मस्त फकीरा
तरी सोबती मित्र जसा..!
.....................तू असा कसा रे..?

असाच येना मनात माझ्या
राहून बघ तू श्वास जसा
जरी न मानवे बंधन तुजला
थांब जरा तू आभास जसा
....................तू असा कसा रे..?

मैत्र आपुले 'अक्षय ठेवा'
युगा युगांचा साथ तसा
आज इथे अन उद्या तिथे
असशी तरी समीप असा
.....................तू असा कसा रे..?

माझा बालपणीचा मित्र 'सुबोध म्हसकर' ! हा माणुस आयुष्यभर उन्मुक्त वार्‍यासारखं आयुष्य जगत आला आहे. सदैव कुठल्या ना कुठल्या एन.जी.ओ. साठी, कधी एखाद्या अनाथाश्रमासाठी, कधी महिलाश्रमासाठी, तर कधी रस्त्यावरच्या अनाथ भटक्या मुलांसाठी मदत गोळा करत देशभर फिरत असतो.
कधी अचानक रात्री-बेरात्री फोन येतो, विशल्या मी अमुक अमुक बस स्टंडवर आहे, मग ते कधी परळ असते तर कधी मुंबई सेंट्रल तर कधी मुंबईतले अन्य कुठले. त्याला वेळ असेल तर घरी येतो नाहीतर मी तिथे जातो. आधी बायको कुरकुरायची, पण एकदा सुब्याची ओळख झाली आणि मग आपोआपच तिदेखील त्याची फॅन झाली. काल मैत्रीदिनानिमीत्त ठाणे गटगला हजर राहीलो. परतताना बायकोने विचारले...
"आज सुबोध कुठे असेल रे?"...
सुब्या, साल्या कुठे आहेस? तूला या मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा! तुझ्या सारखा मित्र मला जन्मोजन्मी लाभावा हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना !

विशाल.

 :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: तू असा कसा रे..?
« Reply #1 on: August 02, 2010, 12:39:05 PM »
khup chhan!!!

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
Re: तू असा कसा रे..?
« Reply #2 on: August 02, 2010, 12:42:18 PM »
खुप खुप आभार मित्रा ! मैत्री दिनाच्या उशीराने का होइना पण लक्ष लक्ष शुभेच्छा !

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: तू असा कसा रे..?
« Reply #3 on: August 02, 2010, 03:54:37 PM »
very nice bro........................ 8)

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
Re: तू असा कसा रे..?
« Reply #4 on: August 02, 2010, 04:39:00 PM »
धन्स मित्रा !

Offline Bahuli

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
 • Gender: Female
Re: तू असा कसा रे..?
« Reply #5 on: August 02, 2010, 05:29:12 PM »
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

असा मित्र आयुष्यात असणे हि मोठी भाग्याची गोष्ट आहे......

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
Re: तू असा कसा रे..?
« Reply #6 on: August 02, 2010, 05:43:02 PM »
आभारी आहे बाहुली! खरोखर असा मित्र असणे ही खुप भाग्याची गोष्ट आहे. सद्ध्या सुबोध बहुदा सिंधुताई वाघ यांच्याबरोबर काम करतोय. त्याचा नवीन मोबाईल नंबर नसल्याने त्याच्या फ़ोनची वाट पाहणे एवढेच माझ्या हातात आहे. आणि मला खात्री आहे मुंबईत आला की तो फ़ोन करणारच.

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: तू असा कसा रे..?
« Reply #7 on: August 03, 2010, 08:32:46 AM »
khupach chan.........U r lucky that u have such a true friend......... :)

Offline Rahu

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
Re: तू असा कसा रे..?
« Reply #8 on: August 03, 2010, 08:50:17 AM »
हरवलो यार....

खरच...

मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!  ;) :)

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
Re: तू असा कसा रे..?
« Reply #9 on: August 03, 2010, 09:23:20 AM »
धन्यवाद मित्रांनो ! :-)