Author Topic: विक्रमादित्याचा पोवाडा  (Read 990 times)

Offline Vkulkarni

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
  • Let's be friends !
    • "ऐसी अक्षरे मेळविन!"  आणि "माझी सखी"

विक्रमादित्य श्री सचीन तेंडुलकर उर्फ़ आपल्या सर्वांच्या लाडक्या तेंडल्याला अप्रेम अर्पण, त्याच्या आणि एकुणच जगातील पहिल्या वहिल्या वन डे द्विशतकाच्या निमीत्ताने केलेला पोवाडा !

कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS
कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला…. हो ओ SSSSSSSS

पण महाराजा… शेर आखीर शेर होता है……

त्यानं सोडला नाही ठाव..SSS,
सोसले…, गुमा SSS न सारे घाव SSS….

लावला नेम, पकडली येळ …..
अन डाव कीं हो साधला ….. जी ई ई SSSSSSS

सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न …
राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS

रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे….
पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला….

शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे….
राजाच्या सैन्यात हाहाकार… सैन्य खचणार कीं काय?
विक्रमादित्यानं…, आधार…., त्याला दिला……
सैन्याचे केले सांत्वन आन धीर कीं हो दिला….
परजली बॅट…, गनिमाला चाप की हो लावला ….. जी ई ई ई SSSSS

महावीराचा पाहूनी रुबाब…
गनिम झाला हैराण…, परेशान…,
त्याने पॉवर प्ले चा व्युह कीं लावला…
पण फिकर नसे विक्रमादित्याला…
मास्टर ब्लास्टरनं इंगा दावला.. जी ई ई SSSSSSSSS

शत्रुचे उतरले कितीक वीर, महावीर रणांगणात..SSSS
वापरले स्लेजिंगचे ब्रह्मास्त्र राजाच्या विरोधात….
सोडली लाज सारी आज रणांगणात हो हो ओ SSSSS
सोडला नाही भाद्दराला नमवण्याचा…. एकही प्रयत्न…SSSS
पण पठ्ठ्याने डाव नाही सोडला जी जी रं जी ई ई SSSSS

शत्रुच्या डावपेचांची वाट लागलेली आहे..
गनिमाला पळता भुई थोडी झालेली आहे..
तशात राजा स्वतः मैदानात उतरलेला आहे…
दमलेल्या भाद्दराला आराम की हो दिला…
अंगावर घेवून गनिमाला.., राजाने डाव जिंकला…. जी ई ई SSSSSS

तर मंडळी अशा रितीने …
गनिमाने माथा कीं हो टेकला SSSSSS हो ओ SSSSS.

म्हणुन म्हणतो…
बोला विक्रमादित्य सच्चीनानंद महाराज की SSSS जय SSSS !

विशाल कुलकर्णी
« Last Edit: August 05, 2010, 03:13:53 PM by Vkulkarni »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):