Author Topic: मैफ़ील  (Read 1091 times)

Offline Vkulkarni

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
  • Let's be friends !
    • "ऐसी अक्षरे मेळविन!"  आणि "माझी सखी"
मैफ़ील
« on: August 05, 2010, 03:10:06 PM »
एक संध्याकाळ दोन प्रतिभावंत मा्यबोलीकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ ‘जयन्ता५२’ ! जयंतदा मनोगतवरही असतात. फेसाळणार्‍या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटुन गेलं…

” हुजूर .., पिलाने की बाते करते है !
कंबख्त..! हम तो बातोंसे नशा पाते है! “

त्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता – खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं…..

खुब जमेगी जब…
मिल बैठेंगे दिवाने तीन
दोन तुझे…, दोन त्याचे…
एखाद दुसरे माझेही सीन…!
गुणगुणणारी, गुंगवणारी
तुझी रंगेल कविता आणि…
फेसाळलेल्या बिअरचे मस्तावलेले टीन …!
तुझी कविता ….
किती हळुवार आणि तरीही घनगर्द…!
किती सावरलं तरी भान विसरायला लावते…
तुझी गझल अन तिचा तो मखमली दर्द !
आता नकोच त्या जखमा अन नस्ते झांगडगुत्ते,
नकोच…, पिसुन-पिसुन कंटाळलेले…
आळसावलेले हुकुमाचे पत्ते !
चल……
मिळुन सोडवू….
तुझ्या बोलक्या कवितेतले अबोल गुंते !
अरे हट…!
कालची बिअर मला चढलीच नाही…
तुझी गझलच एवढी जालीम होती…
ती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही !

विशाल.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: मैफ़ील
« Reply #1 on: August 06, 2010, 09:57:45 AM »
kya baat hai yar!! nasha chadhali tuzya vyasangachi aani kavitechi suddha!!

Offline Vkulkarni

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
  • Let's be friends !
    • "ऐसी अक्षरे मेळविन!"  आणि "माझी सखी"
Re: मैफ़ील
« Reply #2 on: August 06, 2010, 10:00:27 AM »
माझंही तेव्हा तसंच झालं होतं अमोल. बिअर ते दोघे घेत होते आणि धुंद मी झालो होतो. धन्यवाद  ;)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):