स्वप्नांच्या गावी सर्वानाच जायचे असते
चोकलेट च्या बंगल्यात रहायचे असते
त्यासाठीच झटत असतो प्रत्येकजन
प्रत्येकालाच सर्वांच्या पुढे धावायचे असते
पण कळतच नाही, कधी हात सुटतात,
जिन्कन्याच्या धुंदीत नातीच तुटतात
प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचे फुगे
उराशी फुगतात, उराशीच फुटतात
तू जिंकावस, हेच माझं स्वप्नं असलं जरी,
त्याची किम्मत इतकी लावू नकोस तरी,
की हातचं सारं गमावून बसेन मी,
आणि मिटणार नाही आपल्यातली दरी...
- जय