कविता कवीच स्वप्न
निर्मितीचा ध्यास,
कवीचा श्वास
भास-आभास,
जगण्यावरचा विश्वास
भावनांवर घातलेला साज
कवीचा माज,
तिचा वेगळाच बाज
शब्दांचा खेळ,
प्रतिभेचा मेळ
कवीचा हुंकार,
अनुभवांची शिजोरी
कविचा आनंद, परमानंद,
स्वानंद...................
कवीच्या प्रतिभेचा उदय आणि अस्त
त्यांच्यामधला संधिप्रकाश
कवीचा छंद
कवी-रसिकांमधला अनुबंध
ॠणानुबंध.............
कवीच स्वातंत्र
समाजावर ऒढलेला आसुड,
एक क्रांती
कविता एक विचार
कवीचा आचार
कविता अजोड,
थोडी विजोड
आवडली तर मनापासुन दाद द्या
अथवा टिका करा.
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
