असं का, कधी घडत नाही
मला आवडतं ते तुला आवडत नाही
तुला हे पटेल, ते रुचणार नाही
आवडेल का, आवडणार नाही?
सारे प्रश्न मलाच पडतात
तुला का कधी असा प्रश्न पडत नाही?
कितीतरी प्रश्न तर तुला विचारलेच नाहीत
विचारू की नको, तो ही एक प्रश्नच असतो
शब्दांना अडवतो मी, ओठांवरच माझ्या
उगाच तुला दुखावण्याचा उद्देश नसतो
तुझी-माझी आवड एक नसली तरी
आपली निवड सारखी आहे,
जरी कुठल्याही बाबतीत नसली, तरी
तुझ्या निवडीबाबत माझी आवड सारखी आहे....
--जय