जसं आज तुला पाहिलं
ते चित्र कधी तुझ्या डोळ्यांत पाहिलं नव्हतं;
तू जवळ असून माझ्या
तुझं मन कधी माझ्या जवळ राहिलं नव्हतं
वेदना मनातल्या तुझ्या
दडवून ठेवल्यास मनातल्याच कुपीत,
का कधी गरज नव्हती?
मित्र म्हणतोस, पण दडवतोस गुपित
अधिक काय हवे मला
मित्र तुझ्यासारखा, आयुष्य हे जगायला;
तरी मला आवडते
तुला चिडवायला, तुझ्यावर रागवायला
तू नसतास सोबत
तरी आयुष्य मी जगणार होतो,
तू दिलेस रंग जीवनाला
नाहीतर, रंगहीन इंद्र-धनुष्य बघणार होतो
पण आणखी किती दिवस
न जाणे, आणखी किती वर्षे सरतील
पुढच्या वाटा धुंडाळताना
सोबतीला फक्त पाऊलखुणा उरतील!!
-- जय