आता नाही सांगितलं, तर फार उशीर होईल,
आज झाला, न जाणे, पुन्हा कधी असा धीर होईल
तुला एकदा सांगायचंय, तू आहेस किती खास
मनातलं सांगितलं की कसं, मन बेफिकीर होईल,
मला कधीच जमलं नाही, तुझ्यासारखं होणं
तुला माहीतच आहे माझं मन, कसं वेडं स्थिर होईल,
सारा खटाटोप असतो, जगण्यासाठीच ना?
इतकंही व्यापून घेऊन नकोस, संवेदनाच बधीर होईल,
आज तुला वेळ आहे तर, मलाही जगून घेऊ दे,
हेच क्षण असतील सोबत, नंतर फार उशीर होईल.......
--जय