-: गुरुत्वाकर्षण :-
क्षितिजाच्या मर्यादेसाठी,
आकाशाला धरतीची साथ लागते.
अथांग सगाराखाली,
धरती आसाविच लागते.
झाड कितीही वाढले तरी,
मूळ धरतीच्या पोटात असतात.
उंचच उंच इमारतींचे,
पाये जमिनीवर बांधलेले असतात.
आसमंतात विहारनारे पक्षी,
विसाव्यासाठी धरतीवर उतरतात.
आकाशातले ढग देखील,
बरसून जमिनीवर सांडतात.
प्रत्येक जिवाला जगण्यासाठी,
धरतीत उगवलेले लागते.
प्रत्येक लहान-मोठ्याला काळझोप
धरतीच्या कुशीत घ्यावी लागते.
ह्या विचित्र "गुरुत्वाकर्शनाच्या" ओढिला
प्रतिकार करता येत नाही.
विलक्षण मायेचा असा अनुभव,
मातीत मिसळल्याशिवाय मिळत नाही........
Author Unknown