ऐका,ऐका दोस्तांनो,
गाथा नाही जुन्या युगाची
कथा आहे नव्या पिढीची..
जुने सोंगटे,चाल नवी
जुने स्पर्धक,स्पर्धा नवी..
होते इतिहासाची पुनरावृत्ती
की,रचते नवी आवृती..
सिध्द करण्या हुशारी स्वत:ची
ससा अन कासवाची पुन्हा जुंपली..
रणशिंग फुंकले,काळ थांबला
कासव निघाले,ससा धावला..
कठीण होता मार्ग वनाचा
कस होता अंगभुत गुणांचा..
विजयरेषेवर पोहचला ससा
कासवाचा मागमूस नव्हता..
कासव चकित,जग स्तंभित
दिला सशाने मग विजयमंत्र..
काल,कासवाला कमी लेखले
आळसाने माझ्या,मलाच हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
.
.
.
.
अरे,ससा आता कधीच हरणार नाही..

Author Unknown