नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही
नवे तेज लाभो, नवी धार लाभो
सदा प्रेम लाभो, सदा कामना ही
नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही
तुझे गीत येवो मनोमंदिरी या
तुझा ध्यास राहो सदा या उराशी
नवी प्रतिभा अन् कल्पना सुचावी
नवे सामर्थ्य दे, सदा कामना ही
नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही
शब्द लालित्य दे, शब्द चापल्य दे
शब्द माधुर्य दे, शब्द सौदर्य दे
शब्दांनीच पुजतो, शब्द पांडित्य दे
तुझा दास मी, मज शब्द स्वामित्व दे
नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
