पैसा
पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??
घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.
स्वप्न दाखवतोस मोठी मोठी
पण अनेकदा ठरतात अगदी खोटी.
तुझ्याच लोभात अनेक गुरफटतात,
आपल्यांशी भांडून दूर जातात.
पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??
घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.
सर्वांनाच आहे तुझी गरज फार,
तुझ्याच प्राप्तीस होतात अनेक ठार.
नाचवितोस सर्वांना आपल्या बोटाच्या टोकावर,
तरी तुझेच नाव सर्वांच्या ओठावर.
पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??
घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.
Author Unknown