मी रस्ता रस्ता चालत होतो
चालत चालत बोलत होतो ..
या दगडाचा
कुणी ना वाली
ह्रदय अजूनही
याचे खाली
असाच माझा आवाज मी
गुणगुणत होतो ...
अंधाराची
भीती वाटते
घाबर गुंडी
किती दाटते
कुणास ठावुक मनात माझ्या
काय घोळत होतो ...
दूर देशी
कुणी राहते
माझ्या साठी
वाट पाहते
जाईन म्हणतो ,भेटेन म्हणतो
विचारात विरघळत होतो ..
सूर्य
[/size]