हृदयावर तू दिलेला घाव आहे
कोरलेले त्यावर तुझे नाव आहे
आसवांना तू दिले परिमाण माझ्या
घेतला तू या मनाचा ठाव आहे
ही चर्चा तुझ्या रुपाची रंगलेली
बोलणारा वासनांध जमाव आहे
मी कशाला काळजी करु यातनांची
यातनांचा मज बराच सराव आहे
मागणे त्यांचे असे काहीच नाही
घातला त्यांनी तरी घेराव आहे
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
