एकलाच रिकामी, गाडी हाकतो मी
मिटल्या डोळ्यांनी जागतो इथे मी...
सगळीच रात, बाकी आहे अजुनी....
विरहात स्वतःला जाळतो इथे मी....
छळतात रोज तुझ्या असण्याचे भास...
नसण्यास तुझ्या का कधी मानतो इथे मी...
नव्हत्याच ठेवल्या वांझ अपेक्षा कधी...
फुटल्या डोळ्यांनी स्वप्ने पाहतो इथे मी....
हारल्यात माझी गणती करून गेले..
चुकण्यास त्यांच्या रोज हासतो इथे मी..
-पंकज
स्वरचित...