तू माझ्या आयुष्यात वादळा सारखी आलीस
जशी आलीस तशी निघूनही गेलीस
तू येण्यापूर्वी इथे खूप शांती होती
पण मला काय माहित ती वादळा पूर्वीची शांतता होती
आजही सर्व शांत आहे, पण फक्त निसर्ग
माझ मन अजूनही अशांत आहे
का आलीस माझ्या आयुष्यात
का माझ मन अशांत केलंस
यायचंच होत माझ्या जीवनात
तर मग अस दूर का केलंस
तोडायचंच होत नात तर जोडलास कशाला
मोडायचंच होत मन तर जीव लावलास कशाला
प्रेम नसेल माझ्यावर तर मैत्री तरी असू दे
प्रेम नसेल माझ्यावर तर मैत्री तरी असू दे
तुझ्या पायी वेड्या झालेल्या या जीवाला
थोड तरी जगू दे थोड तरी जगू दे