भारत माझा देश
सारे भारतीय माझे बांधव,
तरीही एकमेकांच्या विचारांचे
चालते येथे तांडव.
मनी येथे प्रत्येकाच्या
२०-२० चा ध्यास,
कष्ट करणारया शेतकऱ्याच्या गळ्याला
अजुनही येथे फास.
येथे बरेच खातात तुपाशी
आणि असंख्य आहेत उपाशी,
त्यांच्यासाठी मला काही करायचं
हि भावना प्रत्येकाने बाळगावी उराशी.
उठ समर्थ व्हारे सारे
जोडून खांद्यास खांदा,
महासत्ता बनवू देशाला
हा विचार मनी नोंदवा.
कवी : संदीप अ. खरात.