कोरड्या टिपेच्या चंद्रात तू जाता
बंदिस्त मनात तुला
साठवत गेले
कधी कळालंच नाही ................
तू निरांजनात तुपाची
धार होतास
मी दुधातल्या वाती वळत राहिले
ओठाच्या कळीत साचलेली
गुलाबी
त्यावर धजावणारे तुझे वेडेसे कंप
कधी कळालंच नाही
.............
माझी नसलेली ती श्रुंगारता आहे
माझी रिक्तता मी शोधत
राहिले
छातीवर तू झेललेले बोथट वार
पाठीवर पोळलेले अव्यक्त दाह
कधी
कळालंच नाही ............
ते तीच उरलेलं अस्तित्व आहे
जखमेत खपली मी
होत राहिल
माझ्याशी प्रतारणा केली होतीस
माझीच कुचंबणा मी करत
होते
कधी कळालंच नाही ...........
ती तुझ सौभाग्य राखत होती
[/color]