दिवाळी
दिवाळीचे आगमन आनंदाला आमंत्रण
आणि सुख-सुमनांची घरोघरी उधळण
चिमुकले तेजोदीप उजळती दारोदारी
आकाशीचे तारांगण उतरते धरेवरी
दारी सुंदर रांगोळी रंगा-रंगांनी सजते
आकाशदिव्याची शोभा नयनांस मोहविते
दु:ख-निराशा भरली रात दूर ही सरते
नव्या आशेची पहाट मनामनात हासते
मनाच्या नभी दाटती स्वप्नमेघ परोपरी
सुखसमृद्धीच्या सरी बरसु देत जगावरी
---------------