पाऊस
असा पाऊस पाऊस
थेंबाथेंबाने पडतो
माझ्या जिवाचा गं दाह
कणाकणाने वारीतो
असा पाऊस पाऊस
रिमझिम गं पडतो
मनमोराचा पिसारा
अलगद फुलवितो
असा पाऊस पाऊस
आल्या सरीवर सरी
चिंब भिजून मनाचा
रोमरोम गं झन्कारी
असा पाऊस पाऊस
धुवांधार कोसळतो
चिंब न्हाला मनमोर
देहभान विसरतो
असा पाऊस पाऊस
परोपरीने पडतो
त्याचा धुंदावला गंध
खोल अंतरी भिनतो
----------