सूर्य
घननिळ्या आकाशामध्ये सूर्य पेटलेला
साऱ्या जगी किरणांद्वारे दृष्टी फेकलेला
उष्णतेत त्याच्या आहे जीवनाची उर्जा
पृथ्वीवरील ऋतुचक्राचा तोच आहे कर्ता
किरणांमध्ये त्याच्या सारे जीवनाचे रंग
तो मावळता पशु पक्षी सारे होती मंद
शूर दयाळू कर्णाचा तोच आहे पिता
चंद्राच्या चांदणीवर आहे त्याची कृपा
येत जाता अंबरात काढे रांगोळी
या त्याच्या प्रवासामध्ये नाही सौंगडी
स्वतःला जाळून देई उर्जा जीवनाची
अर्पित आहे त्यास कविता माझी ही मनाची
-स्वप्नील वायचळ