कधीकधी वाटत ,
पुन्हा एकदा लहान व्हाव ,
भातुकलीचा खेळ खेळावं,
दुध भात मनभरून खाव,
आजीचा गोष्टी ऐकाव ,
कधीकधी वाटत .........
पुन्हा शाळेत जाऊन बसावं,
पाटी पेन्सील घेऊन लिहाव,
"मनाचे श्लोक" परत शिकावं,
स्वछंदी बागडाव,
कधीकधी वाटत ..........
college life परत याव ,
त्याच last bench वर बसाव,
friends सोबत campus भर हिंडाव,
आमच्या गप्पानी कधीही न संपाव,
कधीकधी वाटत............
एखाद lecture bunk कराव,
कॅन्टीन मध्ये time pass कराव,
cutting वडापाव वर ताव मराव,
सोबत spin the bottle खेळावं,
कधीकधी वाटत...........
आयुष्यात मागे पहाव,
आठवणींच्या गावी जाव,
आणि कधीही परत न याव,
गेलेले क्षण पुन्हा पुन्हा जागाव.
.....................निवेदिता इंदुलकर