येऊ दे ...
येऊ दे ...सुचू दे ....विचारांची साखळी माझ्या लागू दे
येऊ दे ...सुचू दे ....सप्तस्वरातील कविता मजला स्फुरू दे || धृ ||
प्रत्येकाला तोच रे दिसतो ....सूर्य नभामधी
पाहण्याचा दृष्टीकोन ठरवी ....कोण आहे कवी
निसर्गात भान हरपूनि ....मग्न जो कुणी होई
सरस्वतीचा पुत्र म्हणविसी ....कीर्ती ज्याची भुई || १ ||
कल्पनेच्या दुनियेमधला ....राजा आहे कवी
साध्या सोप्या गोष्टींमधुनी ....काढे कल्पना नवी
शब्दरुपात व्यक्त करवितो ....भावना ज्या मनी
देवकृपेने अद्भुत अशा या ....प्रतिभेचा तो धनी || २ ||
-स्वप्नील वायचळ